रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

Mystical Kabir

मोको कहाँ ढूंढे रे बन्दे

मोको कहाँ ढूंढे रे बन्दे, मैं तो तेरे पास में
ना तीरथ में ना मूरत में, ना एकांत निवास में
ना मन्दिर में ना मस्जिद में, ना काबे कैलास में
मैं तो तेरे पास में बन्दे, मैं तो तेरे पास में

ना मैं जप मैं ना मैं तप में, ना मैं बरत उपास में
ना में क्रिया करम में रहता, नहिं जोग सन्यास में
नहिं पिंड में नहिं अंड में, ना ब्रहमांड आकाश में
ना मैं प्रकटी भंवर गुफा में, सब स्वांसों की स्वांस में

खोजी होए तुंरत मिल जाऊ, इक पल की तलाश में
कहत कबीर सुनो भई साधो, मैं तो हूँ विश्वास में

- संत कबीर

Translation

Where do you search for me oh seeker

Where do you search for me oh seeker, am so close to you,
Not in pilgrimage or in idol, nor in solitude,
Not in temples or in mosques, nor in Kaaba or Kailas,
I am so close to you oh seeker, am so close to you.

Not in prayers or in austerity, nor in different fasting,
Not in duty bound karma, nor in yoga of renunciation,
Not in body or in life force, nor in ethereal universe,
Not in womb of nature, nor in breath of breaths.   

Search earnestly, find me quickly, in blink of a moment,
Says Kabir listen oh seekers, Lord resides in your faith.

- Saint Kabir

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

सुखाचा परिचय

मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य असलं की ते, घर बसल्या मिळतं?

प्रशांत दामले यांच्या ’एका लग्नाची गोष्ट’ नाटकातल्या गाण्याच्या या काही ओळी! खरच, सुख म्हणजे नक्की काय असतं? शोधून सापडतं का ते? सापडलं तर कायम राहतं का ते? असे अनेक प्रष्ण आपल्याला पडतात. सुखाला, आनंदाला इतके आकर्षित का होतो आपण? "मला दुःखी रहायचं आहे" असं म्हणणारी व्यक्ती शोधुन सापडायची नाही या जगात. सगळ्यांनाच सुखाची ओढ!

आपल्याला बरं वाटावं, आनंद मिळावा म्हणून आपण काय काय नाही करत? बाहेर सिनेमाला जातो, चांगले पधार्त खातो, छान छान कपडे घालतो, निसर्गरम्य ठिकाणी भटकांती करतो, जिवलग लोकांवर प्रेमाचा वर्षाव करतो. पण कितीही केलं तरी आनंद क्षणिक असल्यामुळे संपतो आणि आपण परत पळायला लागतो त्याच्या मागं.

या क्षणभंगुर सुखाबद्दल आपलं इतकं आकर्षण असतं कारण आपला खरा गुणधर्म आनंद आहे. हा गुणधर्म अनुभवायला आणि पाळायला आपण पंचेंद्रियांचा वापर करतो. पण गम्मत अशी आहे कि जे सुख पंचेंद्रियांनी मिळते ते लगेच संपते सुद्धा. मग न संपणारा सुखाचा स्रोत आहे का? आहे, पण तो बाहेर बघितल्यास भेटायचा नाही. प्रत्येकाच्या आत आहे तो. डोळे उघडे थेवुन आपण नेहमी बाहेर पाहतो. डोळे बंद करुन आत लक्ष देवुन पाहिल्यास, मूर्तिमंत परमेष्वराच्या रुपात चैतन्याचे अधिष्ठाण आहे असा अनुभव येतो.

पण हा अनुभव प्रत्येकाला लगेच येइल कशावरुन? दःखाचा प्रसंग आला आणि सुखाचा आतला स्रोत दिसेना मग काय करावं? इथं ग. दि. मा. यांची खालील "सुख" ही कविता आठवते. एक तरुण कुत्रा आणि त्याचा आजोबा म्हातारा कुत्रा यांच्यातले संभाक्षण त्यात ग. दि. मा. यांनी छानपैकी टिपले आहे. आजोबा कुत्रा तरुण कुत्र्याला विचारतो कि त्याला कशात सुख मिळतं? तर तो तरुण कुत्रा म्हणतो "आजोबा, मला माझ्या शेपटीत सुख मिळतं. पण कितीही प्रयत्न केला तरी ती शेपटी वाकडी राहते आणि मला ती धरता येत नाही. मग मी तिच्या मागे गोल गोल फिरत राहतो!" मग तरुण कुत्रा आपल्या आजोबांना विचारतो कि त्यांना कशात सुख मिळतं. तेव्हा ते म्हणतात "माझं ही सुख शेपटीतच आहे. पण आता अनुभवाने मी शहाणा झालो आहे. मला कळुन चुकले आहे कि शहाण्या कुत्र्याने सुखा मागे पळु नये. त्याने वास घेत खायचा तुकडा शोधत जागोजागी फिरावं. पुढे चालत असताना, शेपटी मागोमाग येत असते!". थोडक्यात सांगायचं तर, सुख हे मागुन मिळत नाही, ते मागाहुन येत असतं.

तर मित्रांनो / मैत्रिनींनो, आपल्या आयुष्यात कधी दुंखाचा प्रसंग आला किव्वा सुखाने पळ घेतली कि सुखाच्या मागे पळु नका. आपल्या छान छान कामांनी त्याला तुमच्या पाठी पळायला लावा.

- कल्पेश शेट्ये

-----------------------------------------------------------------------------------
सुख

एका वटव्रुक्षाखाली, बसुनीया दोन श्वान,
एकमेकास सांगती, अनुभव आणि ज्ञान...

एके वये वाढलेले, एक पिल्लु चिमुकले,
व्रुद्ध बालकात काही, भाषण चालले...

कुणाठायी आढळले, तुला जीवनात सुख,
व्रुद्ध बालका विचारी, त्याचे चाटुनिया मुख...

मला वाटते आजोबा, सुख माझ्या शेपटात,
सदाचाच झटतो मी, त्यास धराया मुखात...

माझ्या जवळी असुन, नाही मज गवसत,
उघाचाच राहतो मी, माझ्या भोवती फिरत...

अजाण त्या बालकाची, सौख्य कल्पना ऐकुन,
क्षणभरी व्रुद्ध श्वान, बसे लोचन मिटुन...

कुणाठायी सापडले, तुम्हा जीवनात सुख,
तुम्ही वयाने वडिल, श्वान संघाचे नायक...

नातवाच्या या प्रश्णाला, देई जाणता उत्तर,
तुझे बोलणे बालका, बिंचुक बरोबर...

परि शहाण्या श्वानाने, लागू नये सुखापाठी,
आत्मप्रदक्षिणा येते, त्याच्या कपाळी शेवटी...

घास तुकडा शोधावा, वास घेत जागोजाग,
पुढे पुढे चालताना, पुच्छ येते मागोमाग....

- ग. दि. मादगुळकर 

----------------------------------------------------------------------------------

This article was published in the first issue of San Diego Maharashtra Mandal's SanMaan issue. Check http://issuu.com/mmsd/docs/sanm-march_29_2012_v7/1